पंतप्रधान मोदी सोशल जगातील सर्वात लोकप्रिय नेते!
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पदावरून पायउतार होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावरील जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अग्रक्रमावर आले आहे. सध्या फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियावर मोदींचे जगातील सत्तेत असलेल्या इतर कोणत्याही नेत्यांपेक्षा सर्वाधिक चाहते आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटरवर सध्या २ कोटी ६५ लाख फॉलोअर्स आहेत. बराक ओबामांचे ट्विटरवर ८ कोटी २0 लाख फॉलोअर्स आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असेपर्यंत ओबामा हेच ट्विटरवरील जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अग्रक्रमावर होते. मात्र ते या पदावरून पायउतार झाल्याने मोदी या यादीत अग्रक्रमावर आले आहेत. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवर २ कोटी १0 लाख फॉलोअर्स आहेत. तर राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या नव्या पोटुस खात्याचे १ कोटी ४४ लाख फॉलोअर्स आहेत. ट्विटर खात्याशिवाय मोदींचे फेसबुकवर ३ कोटी ९२ लाख चाहते आहेत. गुगल प्लसवर मोदींचे ३२ लाख चाहते असून लिंक्डइनवर १९ लाख तर इन्स्टाग्रामवर ५८ लाख आणि यू-ट्यूबवर ५ लाख ९१ हजार चाहते आहेत. याशिवाय पंतप्रधान कार्यालयाचेही ट्विटरवर १ कोटी ५६ लाख फॉलोअर्स आहेत. भारताच्या पीएमओनंतर अमेरिकेच्या व्हाइट हाऊसच्या ट्विटर खात्याचे १ कोटी ३४ लाख फॉलोअर्स आहेत. तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांचे ट्विटरवर १ कोटी ३१ लाख फॉलोअर्स आहेत. पोप यांचे १ कोटी २५ लाख फॉलोअर्स आहेत. ट्रम्प ट्विटरवर केवळ ४२ जणांना फॉलो करतात. तर मोदी १६४१ जणांना फॉलो करतात. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा तब्बल ६ लाख ३१ हजार ९८७ जणांना फॉलो करतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत