शाओमीचे मोबाईल स्वस्त का असतात , माहिती करून घ्या..
![]() |
| Xiaomi mobail rate |
शाओमी मोबाईल भारताचा नंबर एक मोबाईल निर्माता बनला आहे, परंतु आपण कधीही विचार केला आहे की शोओमी इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त का असतात ? ते आपल्या स्मार्टफोनची विक्री कशी करतात आणि नफा कमवण्यात किती यशस्वी ठरतात.
खरेतर, याचे सर्वात मोठे कारण असे आहे की ,शोओमी किमान नफा पॉलिसी अंतर्गत कार्यरत आहे, म्हणजेच प्रत्येक स्मार्टफोनवर त्याच्या उपभोक्त्यांनापासून फक्त 200 ते 300 रुपये नफा घेतात तर इतर कंपन्या आपल्या फोनवर 2 ते 3 हजार रुपये नफा कमवतात. म्हणूनच शाओमीचे फोन इतर कंपन्यांच्या फोनपेक्षा तुलनेने स्वस्त आहे.
दुसर कारण म्हणजे , शाओमी आपल्या सर्व फोन ऑनलाइन विकतो ज्यामुळे किरकोळ विक्रेते त्याच्या मोबाइलची विक्री करू शकत नाहीत कारण मध्यस्थांच्या आगमनानंतर स्मार्टफोन्सची किंमत वाढते. म्हणूनच, शाओमी आपला फोन स्वतःच विकतो त्यामुळे त्याचा स्मार्टफोनवरील खर्चही कमी होतो आणि लोक शाओमीच्या स्वस्त स्मार्टफोनचा लाभ घेऊ शकतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत